Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule Chandrashekhar Bawankule
0 79.088155

no images yet

SHARE WITH OTHERS
See new updates

Chandrashekhar Bawankule

Latest Updates

सौर उर्जेवर चालणारा कृषीपंप लावण्यासाठी यापूर्वी असलेली ५ एकरची मर्यादा आता वाढवून १० एकरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे १० एकर शेती असलेला लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. शासनाने राज्याच्या सौर कृषी पंप आस्थापित करण्याच्या धोरणात अंशतः बदल केला आहे.
शासनाच्या निकषानुसार लाभार्थी शेतकरी जेथे कृषी पंप बसवायचा आहे , त्या शेतजमीनीचा मालक संबंधित लाभार्थी असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे ५ एकरपेक्षा शेतजमीन आहे व जे शेतकरी सौर कृषी पंप बसविण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना सौर कृषी पंपाच्या अनुसूचित दाराच्या १५ टक्के इतकी रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येईल.

   2 days ago
SEND

ग्रामीण भागात दारूची दुकानं लोकवस्तीत असल्याने लहान मुले, महिला यांना त्रास सहन करावा लागतो. हा विषय लोकहिताचा असल्यामुळे सरकार याबाबतीत गंभीर पावलं उचलणार आहे. गावात असणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे गावातील लोकांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी सरकारने 2008 च्या दारूबंदीच्या आदेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.आता 10 पेक्षा कमी राहती घर असतील त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर दारूचे दुकान स्थलांतरीत करावे लागेल. त्यासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव पारित करावा लागणार आहे. 1 वर्षात स्थलांतर केलं नाही तर दुकानाचा परवाना रद्द होणार आहे. सन 2008 च्या दारुबंदी कायद्यान्वये ग्रामीण भागात ग्रामसभेने मद्य विक्री गावाबाहेर नेण्याबाबतचा ठराव केला तर वस्तीतील दारुविक्री परवाना बंद करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात बरेच दारुविक्री परवाने वस्तीत कार्यरत असून त्यामुळे महिला आणि मुले, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. या विक्रीच्या दुकानांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते, 2008 च्या आदेशात सुधारणा करुन असे मद्य विक्रीचा परवाना वस्तीतून बंद करुन लोकवस्तीच्या बाहेर जिथे 10 पेक्षा कमी घरे असतील, त्यापासून 100 मीटर दूर अंतरावर स्थलांतर करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार ग्रामसभेस देण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांपैकी 50 टक्के मतदारांनी ग्रामसभेत उपस्थित राहून सध्या बहुमताने ग्रामसभेत ठराव पारित केल्यास असे परवाने लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतर करणे बंधनकारक करण्यात आले असून स्थलांतराची कारवाई एक वर्षाच्या आत न केल्यास सदर परवाना कायमस्वरुपी रद्द होईल, अशी तरतूदही करण्यात आली आहे.

   10 days ago
SEND